पौराणिक चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार हृतिक-अक्षय


आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि अक्षयकुमार हे दोन बडे कलाकार स्क्रिन शेअर करताना आहेत. या दोघांची बॉक्स ऑफिसचे हुकमी एक्के अशी ओळख आहे. एका पौराणिक चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांसाठी त्यांच्याकडे विचारणा झाल्याचे वृत्त आहे. आपापल्या बड्या बॅनर्सच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात दोघेही सध्या व्यस्त आहेत. ते या चित्रपटासाठी त्यातून वेळ काढणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पण असे झाले तर त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षयचा गुड न्यूज हा चित्रपट चांगला गल्ला जमवत आहे, तर मागच्या वर्षी ऋतिकच्या सुपर 30 आणि वॉर या चित्रपटांनी देखील बक्कळ कमाई केली होती.

Leave a Comment