असे आहे मनसेच्या महाअधिवेशनाचे पोस्टर


मुंबई – येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून नुकतेच या अधिवेशनाचे पोस्टर लाँच करण्यात आले. गोरेगावातील नेस्को सेंटर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे महाअधिवेशन होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आणि सोबत भगवा महाराष्ट्र राज्य असलेले चित्र या पोस्टरमध्ये आहे. या महाअधिवेशनाचे विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा हे घोषवाक्य भगव्या रंगात लिहण्यात आले आहे. तसेच पोस्टरवर आक्रमक मुद्रेतील राज ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाची पुढची वाटचाल या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे करणार असल्याची भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. पक्षाच्या राजकीय विचारधारेसोबतच मनसे आपला नवीन झेंडा देखील हाती घेणार आहे. राज मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची सांगड घालत पक्षाची पुढची राजकीय वाटचाल करणार आहेत. पोस्टरवर चौरंगी झेंडा नसल्याने पक्षाचा झेंडा बदलला जाणार आहे.

Leave a Comment