शहाळे : आरोग्याचा खजिना


कोवळा नारळ सर्वांनाच आवडतो. पण तो आरोग्यदायी घटकांचा खजिना असतो हे अनेकांना माहीत नसते. मोठे सेलिब्रिटीज, चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्र्योनाही नारळाच्या पाण्याचे महत्त्व कळते. अर्थात ते त्यांना कळते आणि ते हॉटेलातल्या महागड्या पेयांपेक्षाही शहाळे पिणे पसंंत करतात. सामान्य लोकांनी त्यांचे अनुकरण म्हणून नाही पण नारळाचे महत्त्व समजून घेऊन त्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे. कोवळा नारळ हे निसर्गाने आपल्याला दिलेले वरदान आहे. २००६ साली करण्यात आलेल्या एका पाहणीनंतर शहाळ्याची वैशिष्ट्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड या मासिकांत प्रकाशित करण्यात आली होती. त्यात शहाळ्याने शरीरातले कोलस्टेरॉल कमी होते असे म्हटले होते.

आपल्याला निसर्गाने नारळातून जे काही अनमोल असे दिले आहे त्यात कोणीही कसलीही भेसळ करू शकत नाही हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. नारळाचे पाणी नेहमीच फ्रेश असते. ते कधी शिळे होत नाही. ते थंड असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो. एकदा या बाबत एक पाहणी करण्यात आली असता असे लक्षात आले की, पाहणीत गुंतलेल्या रुग्णापैकी ७१ टक्के रुग्णाचा रक्तदाब कसलीही औषधे न देता केवळ शहाळ्याच्या पाण्याने कमी झाला. शहाळ्यातल्या मॅग्नेशियममुळे इन्सुलीन सेन्सीटीव्हिटी वाढते आणि मधुमेहाच्या रुग्णाला दिलासा मिळतो. ब्लड शुगर लेव्हल कमी होते. नारळाच्या पाण्यातले सोडियम आणि काही जीवनसत्त्वे ही ब्लड शुगर कमी करण्यास मदत करीत असतात.

हे पाणी फ्री पार्टिकल्स आणि क्रिस्टल्स तयार करण्यास प्रतिबंध करते त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचे टळते. काही कारणाने आणि अन्नात दोष निर्माण झाल्याने पचनशक्तीवर काही विपरीत परिणाम झाला असेल तर नारळाचे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे त्यामुळे पचनशक्ती ताळ्यावर यायला मदत होते. कारण या पाण्यात तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. काही वेळा जुलाब होतात आणि डी हायड्रेशन होते. अशा वेळी नारळाचे पाणी प्यावे त्यामुळे शरीरातले पाण्याचे प्रमाण वाढते आणि डी हायड्रेशनमुळे आलेला अशक्तपणा कमी होतो. या पाण्याने चेहर्‍यावर तकाकी येते. केसही चांगले होतात. जगात गाजलेल्या काही टेनिसपटूंनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य कोकोनट वॉटर हेच असल्याचे म्हटले होते. काही मॅरेथॉनपटूंंनीही शहाळ्याला श्रेय दिले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment