अतिपरिचयात अवज्ञा


आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात तिखटामिठाचा डबा असतोच. त्यातल्या मसाल्यांचा आपण वापरही करीत असतो पण त्यातला प्रत्येक मसाला म्हणजे जिरे, मेथ्या, हिंग, हळद यांच्यात अद्भुत वाटावेत असे औषधी गुण असतात पण त्यांची आपल्याला माहिती नसते. केवळ या वस्तूच नाही तर आपल्या खाण्यात नेहमी असणार्‍या काही पदार्थांच्या बाबतीतही असेच होते. त्या आपल्या खाण्यात असतात पण त्यांचे औषधी गुणधर्म आपण जाणत नाही. प्रत्यक्षात आपल्याला ते माहीत होतात तेव्हा नवल वाटते. आपण जाता येता चॉकलेट खातो आणि पितोही पण आपल्याला मूड यावा म्हणून आपण ते खात असतो. पण चॉकलेटमध्ये वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्याची ताकद असते हे आपण जाणत नाही.

ब्रोकोलीची भाजीही आता आपल्या खाण्यात आता यायला लागली आहे पण ती संधीवातावर गुणकारी आहे. त्यात अनेक आजारांशी झगडण्याची ताकद आहे. कारण ती अनेक जीवनसत्त्वांनी आणि तंतुमय पदार्थांनी युक्त आहे. मधुमेहींना ती लाभदायक आहे. मश्रुम हाही आपल्या खाण्यात येते पण त्यात इगौथियोनीन हे अँटी ऑक्सीडंटस असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ते सातत्याने होणारी सर्दी आणि फ्लू यांचा प्रतिकार करण्याची ताकद मश्रुममुळे वाढते. मेंदूची ताकद वाढवून निद्रानाशावर औषध म्हणून मश्रुम उपयुक्त ठरते. अल्झायमरचा विकार मश्रुमच्या खाण्याने टळतो. आपल्या नेहमीच्या खाण्यातील परंतु अती गुणकारी पदार्थ चिकन सूप.

आपल्या वाडवडिलांनी चिकन सूप हे रामबाण औषध असल्याचे सांगितले आहे. त्यातील कार्नोसिन हे द्रव्य फ्लू होण्यापासून आपला बचाव करते. चिकन सूप गरम गरम प्यायल्यास घसा मोकळा होतो आणि चोंदलेले नाक मोकळे होते. आपण कधी लांबचा प्रवास करून थकून आलो असू तर आल्या बरोबर चहा घेतो. त्या चहामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा टाकावा. नंतर खाणार असलेल्या पदार्थातसुध्दा थोडी दालचिनी मिसळावी त्याने थकवा पळून जातो. पोटाचे स्नायू आखडले असल्यास दालचिनीने मोकळे होतात. आपल्या नेहमीच्या खाण्यातील एक वस्तू म्हणजे कांदा. कांद्यामध्ये ऍलिसन नावाचे द्रव्य असते जे ऍन्टिबॉयटिक म्हणून काम करते. सर्दी, पडसे, पोट आखडणे आणि मूत्र मार्गातील जंतू संसर्ग यावर कांदा खाणे उपयुक्त ठरते. टरबूज हे आपल्या खाण्यात नेहमी येणारे फळ आहे. त्याच्यामध्ये अनेक फायटो केमिकल्स असतात. ज्यामुळे रक्तप्रवाह वेगवान होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment