मनालीला मिळणार देशातील पहिले आईस हॉकी स्टेडियम


हिमालयाची राणी अशी ओळख असलेल्या मनालीत स्कीइंग आणि स्नो बोर्डिंग अतिशय प्रसिद्ध क्रीडा प्रकार आहेत. त्यासोबत आता येथे देशातील पहिले आईस हॉकी स्टेडियम बांधले जात आहे. यामुळे विंटर स्पोर्ट्स साठी मनाली महत्वाचे स्थळ बनणार आहे. हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बांधले जात असून त्यासाठी नेदरलंडच्या एका कंपनीशी सहकार्य करार केला गेला आहे.

या स्टेडियम साठी १७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. क्रीडा मंत्री गोविंदसिंग ठाकूर या संदर्भात म्हणाले सिमला येथे आईस स्केटिंग रिंग आणि स्पिती येथे आईस हॉकी रिंग नंतर राज्यातील आईस हॉकी स्टेडियम ही पहिली सुविधा आहे. भविष्यात येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील आणि देशातील खेळाडूंना सरावासाठी एका चांगली सुविधा निर्माण होईल. तसेच यामुळे हिवाळी पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.

Leave a Comment