ऐकावे ते नवलच


सामान्यज्ञानातून आपल्याला अनेक प्रकारची रंजक माहिती मिळत असते. तरीही बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मेंदू चक्रावून टाकेल किंवा धादांत खोटी वाटेल अशी पण अगदी खरी अशी काही माहिती येथे देत आहोत. आपल्या सामान्य ज्ञानात त्यामुळे नक्कीच भर पडेल याची खात्री वाटते.

अरब देशात उंट हे महत्वाचे साधन वर्षानुवर्षे वापरात आहे. पण हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल की सौदी ऑस्ट्रेलियाकडून उंट मागवितो किंवा खरेदी करतो. हिप्पो हा प्राणी बोजड आणि ताकदवान मानला जातो. बहुतेक सस्तन प्राण्यांना पांढऱ्या किंवा क्वचित पिवळसर रंगाचे दुध येते पण हिप्पोचे दुध मात्र गुलाबी रंगाचे असते. ऑक्टोपस या प्राण्याला तीन हृदये असतात. देवमाश्याचे हृदय इतके मोठे असते की त्यात माणूस स्वीमिंग पुलाप्रमाणे पोहू शकेल.


जगात अनेक पदार्थ आहेत पण ते काही काळानंतर खराब होतात. मध हा असा एकमेव पदार्थ आहे जो हजारो वर्षे खराब होत नाही. हे अनेकांना माहिती नसेल की काडेपेटीचा शोध लागण्यापूर्वी लायटरचा शोध लागला होता. तुम्ही एकाच खोलीत २३ जणांना ठेवले तर त्यातील किमान दोघांची जन्मतारीख एकच असण्याची शक्यता मोठी असते.

नेप्चून, गुरु आणि शनी ग्रहांवर हिऱ्यांचा पाउस पडतो असे दिसून आले आहे. कासव हा प्राणी शरीराच्या मागच्या भागातून श्वास घेऊ शकतो. शुक्र ग्रहावर ऋतू नाहीत. आकाशात चमकणारी वीज सूर्याच्या पाचपट गरम असते. रशियाचे क्षेत्रफळ प्लुटो ग्रहाएवढे आहे.

Leave a Comment