अर्थसंकल्पाच्या काही मनोरंजक हकिकती


येत्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. त्यापूर्वी हलवा सेरेमनीची परंपरा पार पाडली जाईल. अर्थसंकल्पासंदर्भात अनेक मनोरंजक गोष्टी आता चर्चेत येऊ लागल्या असून त्याची माहिती खास आमच्या वाचकांसाठी.

देशात जीएसटी लागू झाला आणि त्यावर बराच गदारोळ झाला. आजही जीएसटी अनेक कारणांनी चर्चेत आहे. मात्र हा शब्द सर्वप्रथम २८ फेब्रुवारी २००६ साली तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अर्थसंकल्पात वापरला होता. स्वातंत्र्यानंतर ३० वर्षे अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर या शब्दाचा वापर झाला नव्हता तो प्रथम १९९० मध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

१९८० पर्यंत महिला संदर्भात मुद्धे बजेट मध्ये विचारात घेतले गेले नव्हते. पंतप्रधानपदी असताना अर्थसंकल्प सादर करणाऱ्यात १९५८-५९ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा समावेश आहे. नेहरूनी १९५८-५९ च्या बजेटमध्ये गिफ्ट टॅक्स म्हणजे भेट देणाऱ्यांवर कर लागू केला होता. १९८२-८३ च्या बजेट मध्ये प्रथम डिजिटल हा शब्द वापरला गेला तर १९७३-७४ चे बजेट हे ब्लॅक बजेट म्हणून ओळखले जाते.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे एकमेव असे अर्थमंत्री ठरले ज्यांना त्यांच्या जन्मदिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. १९६४ आणि १९६८ या दोन वर्षी २९ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळी ते अर्थमंत्री होते आणि मोरारजी देसाई यांची हीच जन्मतारीख आहे.

Leave a Comment