कोण आहेत ब्रू निर्वासित ?, ज्यांना वसण्यास केंद्र सरकार देणार 600 कोटी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्रिपूराच्या ब्रू निर्वासितांच्या प्रतिनिधींनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत ब्रू निर्वासितांच्या समस्येचे समाधान शोधण्यात आलेले आहे. अमित शहा यांनी सांगितले की, त्रिपूरामध्येच जवळपास 30,000 निर्वासितांना वसवण्यात येईल. यासाठी 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. हे ब्रू निर्वासित नक्की कोण आहेत, जाणून घेऊया.

ब्रू निर्वासित कोणत्याही बाहेरील देशातून आलेले नसून, ते आपल्याच देशातील निर्वासित आहेत. यांना ब्रू (रियांग) जनजाती देखील म्हटले जाते. मिझोरममध्ये मिझो जनजातीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मिझो उग्रवाद्यांनी अनेक अशा जनजातींना लक्ष्य केले. ते यांना बाहेरील समजत असे.

वर्ष 1995 ला यंग मिझो असोसिएशन आणि मिझो स्टुडेंट्स असोसिएशनने ब्रू जनजातीला बाहेरील घोषित केले. ऑक्टोंबर 1997 ला ब्रू लोकांच्या विरोधात हिंसाचार झाला. यामध्ये अनेकांची घरे जाळण्यात आली. तेव्हापासून ब्रू निर्वासित प्राण वाचवण्यासाठी छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यांची भाषा देखील ब्रू आहे. येथील लोकांनी मुलभूत सोयी सुविधा देखील मिळत नाही.

या करारांतर्गत त्यांना मुलभूत सुविधा दिल्या जातील. ज्यामध्ये 2 वर्षांसाठी महिन्याला 5 हजार रुपये रोख आणि 2 वर्ष मोफत रेशन दिले जाईल. ब्रू निर्वासितांना 4 लाख रुपये फिकस्ड डिपॉजिटसह 40 ते 30 फूटचा प्लॉट देखील मिळेल. मतदान यादीत देखील त्यांच्या नावाचा समावेश केला जाईल.

1995 मध्ये यंग मिझो असोसिएशन आणि मिझो स्टुडेंट्स असोसिएशनने राज्यातील निवडणुकीत ब्रू समूहाच्या लोकांचा विरोध केला होता. तेथूनच या सर्व घटनांची सुरूवात झाली. या संघटनांचे म्हणणे होते की, ब्रू समूदायाचे लोक या राज्यातील नाहीत. तेव्हापासून हा तणाव वाढतच गेला.

ब्रू आणि बहुसंख्यक मिझो समुदायात 1996 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे ते निर्वासित झाले. यातूनच ब्रू नॅशनल लिबरेशन फ्रंट आणि ब्रू नॅशनल यूनियनचा जन्म झाला. त्यांनी देखील स्वतःसाठी वेगळ्या जिल्ह्याची मागणी केली. जातीय तणावामुळे जवळपास 30000 ब्रू-रियांग लोकांनी मिझोरममधून त्रिपूरामध्ये शरण घेतली. ते सर्व कंचनपूर, उत्तर त्रिपुरामधील छावण्यांमध्ये राहू लागले.

Leave a Comment