हा फोटो पाहून तुम्हीही ठोकाल विराटच्या चाहत्याला सलाम

अभिनेते, खेळाडू अशा सेलिब्रेटींच्या चाहत्यांची गोष्टच काही वेगळे असतात. हे चाहते सेलिब्रेटींसाठी अनेक गोष्टी करतात. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची गोष्ट देखील अशीच. विराटचे चाहते त्याच्या प्रेमापोटी टॅटू काढण्यापासून फ्रेम बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी करतात. अशाच एका चाहत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

चिराग खिलारे नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. यात लिहिले आहे की, ह्रदयापासून ते डोक्यापर्यंत. या फोटोमध्ये चाहत्याने आपल्या केसांची कटिंग करून विराटचा चेहरा तयार केला आहे.

या चाहत्याने विराट प्रती असलेले प्रेम दर्शवण्यासाठी असे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Leave a Comment