…अन् महिंद्रांना आली पत्नीला केलेल्या प्रपोजची आठवण

काही दिवसांपुर्वी एका हॉलिवुड फिल्ममेकरने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या आवडत्या डिझनी चित्रपटाचा एक क्षण रि-क्रिएट करत प्रपोज केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता हा व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील हैराण झाले आहेत.

महिंद्रांनी ली लोईक्लेरच्या प्रपोजचे कौतूक करत स्लिपिंग ब्यूटी सीनचा तो व्हिडीओ देखील शेअर केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार्टुन कॅरेक्टर प्रिन्स फिलिप गर्लफ्रेंड ओरोराला प्रपोज करत आहे, तेव्हाच लोईक्लेर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतात.

आनंद महिंद्रांनी लिहिले की, ही क्लिप व्हायरल होत आहे. या व्यक्तीने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी डिझनी चित्रपटातील एनिमेटिड क्लिपला हॅक केले आणि मला वाटत होते की, मी 40 वर्षांपुर्वी शानदार प्रपोज केला होता. आता मला त्याचा न्यूनगंड वाटत आहे.

आनंद महिंद्रा यांचे लग्न वर्व मॅग्झिनच्या संस्थापक अनुराधा महिंद्रा यांच्याबरोबर झालेले आहे. काही महिन्यांपुर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले होते की, ते आपल्या पत्नीला इंदौरमध्ये भेटले होते व तेथेच प्रेमात पडले.

अनेक युजर्स आता आनंद महिंद्रा यांना त्यांनी 40 वर्षांपुर्वी आपल्या पत्नीला कसे प्रपोज केले ते विचारत आहेत.

Leave a Comment