‘हा’ फुटबॉल क्लब ठरला सर्वात श्रीमंत क्लब


माद्रिद – जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉल क्लबच्या यादीत स्पेनचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब बार्सिलोना अव्वल स्थानी आहे. डेलॉइट फुटबॉल मनी लीगच्या मते, बार्सिलोनाने २०१८-१९ मध्ये ९३.५६७ करोड डॉलर्स म्हणजे साडे सहा अब्ज रूपयांच्या उत्पन्नासह सर्वात श्रीमंत क्लबचे स्थान मिळवले आहे. वृत्तसंस्था एफफेच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीच्या कमाईत बार्सिलोनाने २२ टक्क्यांनी वाढ केली. यावेळी त्याचा कमर्शियल महसूल १९ टक्क्यांनी वाढला असून प्रसारण महसूल ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

यावर्षीच्या कमाईमुळे बार्सिलोना प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदपेक्षा पुढे आहे. सर्वात श्रीमंत क्लबच्या पहिल्या दहामध्ये पाच क्लब इंग्लंडचे आहेत. यात मँचेस्टर युनायटेड (तिसरे स्थान), मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, टॉटनहॅम आणि चेल्सी यांचा समावेश आहे. तर, जर्मनीचा म्युनिक, फ्रान्सचा पॅरिस सेंट-जर्मेन आणि इटलीचा जुव्हेंटसने या यादीत स्थान मिळवले आहे.

Leave a Comment