205 कोटींच्या पेंटिंगला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला 410 कोटींचा दंड

स्पेनच्या मॅड्रिड उच्च न्यायालयाने एका कोट्याधीश उद्योगपतीला बेकायदेशीररित्या देशाच्या बाहेर 205 कोटी रुपयांची दुर्मिळ पेटिंग विकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. 83 वर्षीय वृद्ध व्यक्ती जॅमी बोटिनला 18 महिन्यांचा कारावास आणि 410 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तस्करी करण्यात येत असलेली पेटिंग पाब्लो पिकासोची होती. याला स्पेनच्या सरकारने राष्ट्रीय वारसा घोषित केलेले आहे.

जॅमी बोटिन यांनी ही पेटिंग 1977 मध्ये खरेदी केली होती. त्यांच्यावर आरोप आहे की, ते लंडनमधील एका लिलाव करणाऱ्यांना ही पेटिंग विकायला घेऊन चालले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी 2015 ला बोटिन यांच्या याटवर पेटिंग जप्त केली होती. सध्या ही पेटिंग रैना सोफिया म्यूझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे.

स्पेनच्या नियमानुसार, कोणतीही 100 वर्ष जुनी वस्तू राष्ट्रीय वारसा असते. परदेशात या वस्तू विकण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. बोटिन स्पेनमधील एका मोठ्या बँकेचे चेअरमन देखील होते. बोटिन यांनी मात्र न्यायालयाचे आरोप नाकारले आहेत. ते म्हणाले की, त्यांनी ही पेटिंग स्पेन नाही तर स्विर्झलँडवरून खरेदी केली आहे. हे प्रकरण तस्करीचे नसून, कारण ही पेटिंगच परदेशातून खरेदी केलेली आहे.

Leave a Comment