प्लास्टिक रिसायकल्ड करून बनवला लाकडाचा पर्याय

कॅनडाच्या एका कंपनीने शहरातील प्लास्टिक कचऱ्याला रिसायकल्ड करून लाकडाचा पर्याय तयार केला आहे. गुडवूड प्लास्टिक कंपनी नोवा स्कॉटिया प्रांतातील हालीफॅक्स येथे जमा होणारा 80 टक्के प्लास्टिक कचरा रिसायकल्ड करते. याद्वारे कंपनी बिल्डिंग ब्लॉक तयार करत आहे. प्लास्टिकद्वारे बनलेल्या या ब्लॉकला ड्रिल करता येते, त्यावर खिळे देखील ठोकता येतात. लाकडाप्रमाणे याचा सर्व गोष्टींसाठी वापर करता येऊ शकतो.

कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याबरोबरच यामुळे लाकडांसाठी झाडे देखील तोडली जात नाहीत. यामुळे स्थानिक लोक, आमदार देखील खूष आहेत.

गुडवूडकडे येणारा अधिकत्म कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांच्या स्वरूपात येतो. याशिवाय प्लास्टिकचे जार व पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला देखील कंपनी रिसायकल्ड करते.

गुडवूडचे उपाध्यक्ष माइक चैसी यांनी सांगितले की, त्यांच्या प्रोडक्टपासून पिकनिक टेबल ते पार्क बेंचपर्यंत काहीही बनवू शकता. आपले बिझनेस मॉडेल इतर क्षेत्रातही लागू करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment