पाकिस्तानचा आण्विक शस्त्र चोरी करणारा वैज्ञानिक ए क्यू खानबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. खानने कॅनडाकडून आण्विक चोरीकरून पाकिस्तानमध्ये आण्विक कार्यक्रम संचालित केला. याचबरोबर इराण, लीबिया, उत्तर कोरिया सारख्या देशांना देखील विकले. तेव्हापासून पाकिस्तान आण्विक तस्करी आणि क्षेपणास्त्र टेक्नोलॉजीची चोरी करत आला आहे. आता पाकिस्तानच्या पाच जणांवर अमेरिकेचे तंत्रज्ञान चोरी करण्याचा आरोप लागला आहे. रावळपिंडी येथील फ्रंट कंपनी बिझनेस वर्ल्डशी संबंधित पाच पाकिस्तानींवर अमेरिकेत आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाची तस्करी केली.
अमेरिकेच्या जस्टीस डिपार्टमेंटनुसार, हे पाचही पाकिस्तानी नागरिक कॅनडा, हाँगकाँग आणि ब्रिटनमध्ये राहतात. हे आपल्या कंपन्यांसाठी जगभरात उत्पादन खरेदीचे नेटवर्क स्थापन करत असे. त्यांच्या कंपन्या अॅडवांस्ड इंजिनिअरिंग रिसर्च ऑर्गनायझेशन आणि पाकिस्तान ऐटमिक एनर्जी कमिशनसाठी अमेरिकेत तयार झालेले उत्पादन खरेदी करत असे. या कंपन्या अमेरिकन सामानांची निर्यात विना एक्सपोर्ट लायसन्सचेच करतात, जे अमेरिकेच्या कायद्या विरोधात आहे.
अमेरिकन असिस्टेंट अटॉर्नी जनरल जॉन सी डेमर्स यांनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेत निर्मित उत्पादन अशा कंपन्यांना निर्यात केले, ज्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरवण्यात आलेले आहे. कारण या संस्थेंचे संबंध पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र कार्यक्रमांशी आहे.
या आरोपींमध्ये मुम्मद कामरान वली (41) पाकिस्तानमधील मुहम्मद अहसान वली (48), कॅनडातील हाजी वली मुहम्मद शेख (82), हाँगकाँगमधील अशरफ खान मुहम्मद आणि यूकेमधील अहमद वहीद (52) यांचा समावेश आहे. या सर्वांवर इंटरनॅशनल एनर्जी इकनॉमिक पॉवर्स अक्ट आणि एक्सपोर्ट कंट्रोल रिफॉर्म अक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या सर्वांना अटक करण्यात आलेले आहे.
पाकिस्तानच्या या तस्करी नेटवर्कच्या खुलाशामुळे भारताच्या सुक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वपुर्ण आहे. अमेरिकन उत्पादन ज्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत, त्या जागेची नावे अद्याप सांगण्यात आलेली नाहीत.
16 वर्षांपुर्वी अशाच प्रकारे पाकिस्तानी वैज्ञानिक एक्यू खानने डच कंपनी रेंकोकडून सेंट्रीफ्यूज चोरी केला होता. ज्याच्या जोरावर पाकिस्तानने 1980 मध्ये अणुबॉम्ब तयार केला होता.