असा आहे पंतप्रधान निवासस्थान ते राष्ट्रपती भवनाच्या नवीन इमारतींचा आराखडा

राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत नवीन इमारतींसाठी सेंट्रल व्हिस्टाचा नवीन मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या भागात संसदेच्या दोन्ही सदनांसाठी जास्त सदस्य क्षमता असलेल्या नवीन इमारती बांधल्या जातील. सोबतच केंद्रीय सचिवालयासाठी 10 नवीन इमारती बनवल्या जातील. राष्ट्रपती भवन, सध्याचे संसद भवन, इंडिया गेट आणि राष्ट्रीय अभिलेखागारच्या इमारती तशाच राहतील. या योजनेत मागील 3 महिन्यात 6वेळा बदल करण्यात आले आहेत. अद्याप मास्टर प्लॅन निश्चित झालेला नाही.

सेंट्रल व्हिस्टाच्या मास्टर प्लॅननुसार, जुन्या गोलाकार संसद भवनासमोरील गांधीजींच्या पुतळ्याच्या मागे त्रिकोणी संसद भवन बनेल. नवीन संसद भवनात लोकसभा आणि राज्यसभेसाठी एक-एक इमारत असेल. मात्र सेंट्रल हॉल नसेल. हे 13 एकरमध्ये बनेल. या जागेवर सध्या पार्क आणि पार्किंग आहे.

नवीन सदनात 900 सदस्यांसाठी जागा –

लोकसभेच्या नवीन इमारतीमध्ये संसदेच्या आत 900 सीट असतील. कारण भविष्यात लोकसभेच्या जागा वाढल्या तर अडचण निर्माण होऊ नये. नवीन सदनात दोन सदस्यांसाठी सीट असेल. ज्याची लांबी 120 सेंटीमीटर असेल. संयुक्त सत्रावेळी याच सीटवर 3 खासदार बसतील. राज्यसभेच्या नवीन इमारतीमध्ये 400 सीट असतील. याशिवाय प्रत्येक खिडकी वेगळ्या आकाराची असेल.

विजय चौक ते इंडिया गेटमध्ये 10 इमारती –

केंद्रीय सचिवलायासाठी विजय चौक ते इंडिया गेटमध्ये 4 प्लॉटवर 10 आधुनिक इमारती असतील. येथेच सर्व मंत्रालय असतील. 3 प्लॉटमध्ये 3-3 आठ मजली इमारत आणि चौथ्या प्लॉटमध्ये एक इमारत व कन्वेंशन सेंटर असेल. इमारतींची उंची इंडिया गेटपेक्षा कमी असेल.

एक कन्वेंशन सेंटर असले, ज्यात 8 हजार लोक बसण्याची क्षमता असेल. यात 7 हॉल असतील. सेंट्रल सेक्रेटेरिएट आणि उद्योग भवनाने सर्व इमारतींना जोडण्यासाठी अंडर ग्राउंड पब्लिक मूव्हर शटल्स असतील.

नवीन पीएमओ, पंतप्रधान निवास –

सध्या नॉर्थ ब्लॉकच्या मागे उपराष्ट्रपतींचे निवासस्थान बनेल. सध्या उपराष्ट्रपतींचे निवासस्थान लुटियंस झोनमध्ये आहे. साउथ ब्लॉकच्या सध्याच्या इमारतीमागे पीएमओ बनेल व त्याच्या मागेच पंतप्रधानांचे निवासस्थान बांधण्यात येईल. सध्या पंतप्रधानांचे निवासस्थान 7, लोक कल्याण मार्गावर आहे. नॉर्थ आणि साउथ ब्लॉकमध्ये नॅशनल हिस्ट्री म्यूझियम बनेल. दोन्ही इमारतींची कार्यालये सेंट्रल एवेन्यूच्या पहिल्या दोन इमारतीमध्ये स्थलांतरित होतील.

राष्ट्रीय अभिलेखागार इमारतीमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही. यासाठी सर्व जुन्या इमारती तशाच ठेवल्या जातील. राष्ट्रपती भवनच्या मागे नॅशनल बायोडाटावर्सिटी आर्बरीटम बनेल. येथे दुर्मिळ झाडांचे रक्षण केले जाईल. यमूना नदीच्या किनारी न्यू इंडिया गार्डन विकसित होईल.

Leave a Comment