निर्भयाच्या दोषींचे नवे डेथ वॉरंट जारी, 1 फेब्रुवारीला लटकवणार फासावर


नवी दिल्ली – निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आता 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार अशा संदर्भातील डेथ वॉरंट दिल्ली न्यायालयाने जारी केले आहे. 22 जानेवारीला दिल्ली न्यायालयाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होते. पण डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आल्यानंतर 22 तारखेचे डेथ वॉरंट रद्द करण्यात आले होते. दिल्ली न्यायालयाने आता नवे डेथ वॉरंट जारी केली आहे. निर्भयाच्या दोषींना या डेथ वॉरंटनुसार 1 फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. ही फाशी सकाळी 6 वाजता दिली जाणार आहे.

राष्ट्रपतींकडे या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली. पण फाशी 22 तारखेला दिली जाणार नाही हे तेव्हा स्पष्ट झाले होते. कारण दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यासाठी किमान 14 दिवसांचा अवधी द्यावा लागतो, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. आता न्यायालयाने नवे डेथ वॉरंट काढून 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाईल असा निर्णय दिला आहे.

Leave a Comment