नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. भारतरत्नपेक्षा महात्मा गांधी हे मोठे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे.
महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठे
सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना केंद्र सरकारला याबाबत लिहिण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीशांनी म्हटले की, कोणत्याही औपचारिक मान्यतेची महात्मा गांधींना आवश्यकता नाही. ते राष्ट्रपिता आहेत. अशाप्रकारच्या मान्यतांपासून ते वरच्या स्तरावर आहेत. त्यांच्याकडे लोक सन्मानाच्या नजरेतून पाहतात.
अनेकवेळा जनहित याचिका महात्मा गांधींना भारतरत्न देण्याच्या मागणीवरुन दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींना भारतरत्न देणे म्हणजे त्यांचे योगदानाला कमी लेखणे असेल असे म्हणत प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.