ही आहेत जगातील 5 सर्वात श्रीमंत कुटुंब

गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल तर नेहमी ऐकले असेल. मात्र तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे माहिती आहे का ?

Image Credited – Business Insider

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत 5व्या क्रमांकावर वर्दाईमर कुटुंब हे आहे. त्यांच्या कंपनीचे नाव शनेल आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 57.6 अब्ज डॉलर आहे.

Image Credited – houseofsaud

या यादीत चौथ्या क्रमांकावर सौदीचे राजघराणे अल सऊद आहे. त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर आहे.

Image Credited – Celebrity Net Worth

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे कोच कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाचे एकूण संपत्ती 124.5 अब्ज डॉलर आहे. 1940 मध्ये फ्रेड कोच यांनी द वूड रिव्हर ऑईल अँड रिफायनिंग कंपनीची स्थापना केली होती.

Image Credited – Business Insider Malaysia

अमेरिकेचे मार्स कुटुंब जगातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्यांच्या कंपनीचे नाव देखील मार्स कंपनी आहे. त्यांची एकूण संपत्ती 126.5 अब्ज डॉलरची आहे. 1963 मध्ये मार्सने नॉर्थलँडमध्ये चॉकलेट फॅक्ट्री सुरू केली होती.

Image Credited – CNBC

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून वॉल्टन कुटुंबाला ओळखले जाते. वॉल्टन हे वॉलमार्ट कंपनीचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 190.5 अब्ज कोटी आहे. 1945 मध्ये सॅम वॉल्टनने आपले पहिले स्टोर सुरू केले होते.

Leave a Comment