संजय राऊत यांच्या वक्तव्याला करीम लाला यांच्या नातवाने दिला दुजोरा


मुंबई – इंदिरा गांधी करीम लाला याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जात असत असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने वाद निर्माण झाला असताना संजय राऊत यांच्या वक्तव्याला करीम लाला याच्या नातवाने दुजोरा दिला आहे.

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची आपल्या कार्यालयात भेट झाल्याचा फोटो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील करीम लाला याची भेट घ्यायचे असा दावा यावेळी त्यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने या वृत्तवाहिनीने दिले आहे.

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्यामधील भेटीचे फोटो सलीम पठाण यांनी शेअर केले आहेत. त्यांनी याचबरोबर इतर राजकीय नेत्यांचे फोटोही शेअर केले आहेत. इंदिरा गांधींसंबंधी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सलीम पठाण यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार ? तसेच मंत्रालयात कोण बसणार ? हे अंडरवर्ल्ड ठरवत असे. जेव्हा मंत्रालयात हाजी मस्तान येत असे तेव्हा अख्ख मंत्रालय खाली येत असे. पायधुनी येथे करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Comment