आता रेल्वेत विना नेटवर्क पाहता येणार मोफत हाय-स्पीड व्हिडीओ

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व मजेशीर व्हावा यासाठी अनेक नवनवीन सुविधा देत आहे. आता रेल्वे एक कंटेट स्ट्रिमिंग अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा अ‍ॅप प्रवासी स्मार्टफोन, टॅबलेट अथवा लॅपटॉपवर सहज डाउनलोड करू शकतात. यामध्ये विविध भाषेत कंटेट आधीच अपलोड केलेले असतील. पुढील 45 दिवसांमध्ये 4 ठराविक रेल्वेच्या प्रवाशांसाठी हा अ‍ॅप उपलब्ध असेल.

रेल्वेच्या कोचेजमध्ये कंटेंट सर्व्हर्ससोबत हाय-फाय एक्सेस प्वाइंट्स इंस्टॉल केले जाईल. याच्या कंटेटला रेलटेल डेटा सेंटर्समध्ये इंस्टॉल सेंट्ल सर्व्हरद्वारे मॅनेज केले जाईल. हे सेंटर्स गुरुग्राम आणि सिंकदराबाद येथे आहेत. रेल्वे चालत असताना देखील हाय-स्पीड कंटेट पाहण्याचा आनंद घेता येईल.

रेलटेलचे म्हणणे आहे की, स्टेशन वाय-फाय नेटवर्कवर सर्व रेल्वेचे कोच सर्व्हर्सला वेळोवेळी स्वचलित व रिफ्रेश केले जाईल. ही सेवा 5573 रेल्वे स्टेशनवर उपलब्ध केली जाईल. या अ‍ॅपमध्ये प्रवासी फ्रीमध्ये कंटेट पाहू शकतील. जर एखाद्या प्रवाशाला प्रिमियम स्बस्क्रिप्शन घ्यायचे असेल, तर ऑनलाईन ट्रांजेक्शनद्वारे ते देखील घेता येईल.

हा अ‍ॅप सर्व प्रिमियम, मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये उपलब्ध असले. यात सर्च, वॉच आणि डाउनलोड कंटेट असे पर्याय असतील. प्रवासी हाय-क्वॉलिट कंटेट जसे की, चित्रपट, गाणी, वेब सीरिज डाउनलोड करू शकतात. पुढील 2 वर्षात हा अ‍ॅप सर्व रेल्वेंसाठी उपलब्ध होईल.

Leave a Comment