सध्या भारतीय नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र स्वातंत्र्याआधी नोटांवर गांधीजींचा फोटो नव्हता. गांधींजींच्या आधी दुसऱ्या व्यक्तीचा फोटो नोटांवर छापलेला असे. ही व्यक्ती कोण होती, त्याविषयी जाणून घेऊया.
गांधीजींच्या आधी या व्यक्तीचा होता भारतीय चलनावर फोटो

1510 मध्ये देशात पोर्तुगीज आले. त्यांनी गोव्यावर ताबा मिळवल्यानंतर रुपया हे चलन सुरू केली. गोवामध्ये पोर्तुगीज इंडिया नावाने नोट छापायचे. या नोटांना एस्कुडो नाव देण्यात आलेले होते. गोव्याच्या या नोटांवर पोर्तुगीज राजा जॉर्ज द्वितीयचा फोटो होता.

हैदराबादचे निझाम देखील स्वतःच्या नोटा छापत असे. 1917-18 मध्ये त्यांना असे करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यांच्या नोटांवर नाण्यांचा छाप असे.

आरबीआयने 1938 मध्ये सर्वात प्रथम 5 रुपयांची नोट जारी केली. ज्यावर युनायडेट किंगडमचे राजे जॉर्ज VI चा फोटो होता. त्यानंतर फेब्रुवारी 1938 मध्ये 10 रुपयांची नोट व मार्चमध्ये 100 व 1000 रुपये आणि जूनमध्ये 10 हजाराची नोट जारी करण्यात आली होती. यांच्यावर सर जेम्स टेलरची स्वाक्षरी होती.

स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा 1949 मध्ये नोट छापण्यात आली, तेव्हा त्यावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ छापण्यात आला. 1923 मध्ये 1, 2½, 5, 10, 50, 100, 1000, 10 हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. 1940 मध्ये 1 रुपयाची नोट जारी करण्यात आली. यामध्ये सुरक्षे संबंधित अनेक गोष्टी होत्या.

गांधीजींचा फोटो नोटांवर सर्वात प्रथम 1969 मध्ये वापरण्यात आला. त्यावेळी त्या फोटो मागे सेवाग्राम आश्रम होता. आज जो फोटो नोटांवर पाहिला मिळतो, तो फोटो 1987 पासून वापरण्यात येत आहे.