ब्रिटनच्या महाराणीचे ‘क्विन काऊंसिल’ म्हणून हरीश साळवेंची नियुक्ती


मुंबई – ब्रिटनच्या महाराणीचे ‘क्विन काऊंसिल’ म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कायद्याच्या ज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर साळवे हे ओळखले जातात. साळवे यांनीच कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानविरोधात कुलभूषणची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात ताकदीने मांडली होती. त्यांनी यासाठी केवळ १ रुपया मानधन घेतले होते.

१३ जानेवारीला नव्या नियुक्त्यासंदर्भात ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने यादी प्रसिद्ध केली. साळवे यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. १६ मार्चला साळवे यांची अधिकृत नियुक्ती होईल. ब्रिटनच्या महाराणीचे ‘क्विन काऊंसिल’ म्हणून वकिलीच्या क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखवलेल्या वकिलांनाच नेमण्यात येते.

Leave a Comment