आरटीआय दाखल करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागरिकत्व विचारले


केरळ – देशभरात नागरिकत्व संशोधन कायद्यामुळे वादंग उठले असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वावर केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील चालक्कुडीचा रहिवासी असलेल्या जे कल्लुवीट्टिलने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मोदींचे नागरिकत्व जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीने आरटीआय अर्ज दाखल केला आहे. राज्याच्या माहिती विभागाला 13 जानेवारी रोजी मिळालेल्या पत्रात पंतप्रधान मोदी भारताचे नागरिक आहेत का नाही ? अशी माहिती विचारण्यात आली आहे.

मोदींचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची या अर्जात मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करण्यासाठी केरळ सरकारने याचिका दाखल केली होती. केरळ याचिका दाखल करणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने आता थेट मोदींच्या नागरिकत्वावरच प्रश्चचिन्ह उपस्थित केल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. यानंतर आता भाजप यावर कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment