दिल्ली भारताची राजधानी म्हणून ओळखली जाण्याबरोबरच अनेक ऐतिहासिक संदर्भांसाठी ओळखली जाती. दिल्लीच्या तख्तावर अनेक राजे, महाराजे विराजमान झाले. या शेकडो वर्षांच्या इतिहासात दिल्लीचे नाव अनेकदा बदलले गेले. दिल्लीच्या नावाच्या याच इतिहासाविषयी जाणून घेऊया.

दिल्लीच्या नावाचा सर्वात प्रथम उल्लेख पौराणिक काळात आढळतो. सर्वात प्रथम पांडवांनी दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हणून वसवले होते.

दिल्लीच्या नावाबद्दल एक गोष्ट खूप प्रचलित आहे. ईसा पुर्व 50 मध्ये मोर्यांचे राजे धिल्लू होते. त्यांना ‘दिलू’ देखील म्हटले जाते. याच नावाच्या उच्चारावरून दिल्ली झाले असण्याची शक्यता आहे.
एक तर्क असा देखील दिला जातो की, तोमरवंशाचे राजे धव ने या भागाचे नाव ‘ढिली’ ठेवले होते. किल्ल्याच्या आतील एक लोखंडाचा खांब हलत होता. त्यामुळे ढीला असे नाव दिले. हा ढिली शब्द नंतर दिल्ली झाला.

इतिहासकारांनुसार, याशिवाय तोमरवंशाच्या काळात जी नाणी तयार केली जात असे त्यांनी ‘देहलीवाल’ म्हटले जाई. यावरूनच दिल्ली नाव पडले असावे. तसेच, आधी दिल्लीला भारताचा ‘उंबरठा’ (हिंदीत –दहलीज) मानले जाई. हेच दहलीज नंतर दिल्ली झाले.

मोर्य सम्राट दिलूबद्दल अनेक दावे केले जातात. याचीच एक गोष्ट प्रसिद्ध आहे. सांगितले जाते की, त्यांच्या सिंहासनासमोर एक खिळा होता. हा खिळा नरकापर्यंत पोहचला होता. राज्याच्या ज्योतिषांनी भविष्यवाणी केली की, जोपर्यंत हा खिळा आहे तोपर्यंत मोर्य साम्राज्याचे राज्य असेल. भविष्यवाणीनंतर राजाच्या मनात आले की, खिळा खूपच छोटा आहे. म्हणून त्यांनी तो काढला व पुन्हा गाडला. मात्र तो मजबूत बसला नाही आणि हलू लागला. यातूनच हिंदीत किल्ली तो ढिल्ली भई अशी म्हण पडली. त्यातूनच दिलू, ढिल्ली आणि दिल्लूचे दिल्ली झाले.

महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या काळात देखील दिल्ली व याच्या संस्थापकांचा उल्लेख आढळतो. त्यांच्या दरबारात चंदरबरदाई कवी असे. त्यांची हिंदी रचना पृथ्वीराज रासोमध्ये तोमर राजा अनंगपालला दिल्लीचे संस्थापक म्हटले आहे. अनंगपालने लाल-कोट बांधला होता, असे म्हटले जाते. महरौलीचे गुप्त-कालिन लौह-स्तंभ देखील त्यांनीच दिल्लीला आणले होते. सर्वात प्रथम सन 1170 मध्ये सर्वात प्रथम उदयपुरच्या शिलालेखांवर दिल्ली अथवा दिल्लिका हे शब्द आढळले.