300 रुपये कमवणाऱ्या मजूराला आयकर विभागाची 1 कोटींची नोटीस

आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसचा एक विचित्र प्रकार सध्या समोर आला आहे. कल्याण येथे राहणाऱ्या मजूर भाऊसाहेब अहिरे यांना आयकर विभागाने 1 कोटी 5 हजार रुपयांची नोटीस पाठवली आहे. मात्र अहिरे यांचे दररोज उत्पन्न केवळ 300 रुपये आहे. अहिरे आपल्या कुटुंबासोबत कल्याण येथे झोपडीत राहतात.

आयकर विभागाने त्यांच्या बँक खातेत्या जमा रक्कमेच्या आधारावर ही नोटीस पाठवली. अहिरेंनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आयकर विभागानुसार, नोव्हेंबर 2016 ला नोटबंदीच्या काळात अहिरे यांच्या खात्यात 58 लाख रुपये जमा करण्यात आले होते. मागील वर्षी खात्यात 5 सप्टेंबरला 58 लाख रुपये जमा करण्यासाठी स्पष्टीकरण मागितले आहे.

अहिरे यांनी सांगितले की, ते शिकलेले नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांकडून समजून घेतल्यानंतर त्यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेथून त्यांना बँकेशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.

अहिरे यांनी सांगितले की, बँकेशी संपर्क साधल्यावर त्यांनी माहिती दिली की त्यांच्या पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रावर बनावट खाते खोलण्यात आले व त्यात पैसे जमा करण्यात आले.

आता अहिरे यांनी दावा केला आहे की, फसवणूक करणाऱ्यांनी खोटी स्वाक्षरी आणि कागदपत्रांद्वारे खाते उघडले. सोबतच त्यात फोटो देखील लावला. त्यानंतर आयकर विभागाकडून 7 डिसेंबरला वर्ष 2017-18 उत्पन्नासाठी 1 कोटी 5 हजार रुपये कर्ज भरण्यास सांगितले. 30 दिवसात पैसे न भरल्यास वसूली केली जाईल, असेही सांगण्यात आले.

अहिरेंचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत आयुष्यात 1 लाख रुपये बघितलेले नाहीत. तर एवढे पैसे कसे भरणार. अहिरे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Leave a Comment