हा गायक वसवणार स्वतःचे शहर

शाहरूख व करिनाच्या ‘रावन’ या चित्रपटातील ”छम्मक छल्लो” हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. हे गाणे गाणारा गायक एकॉन आता स्वतःचे शहर उभारणार आहे. त्याने एका ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली.

एकॉनने आपल्या या योजनेबद्दल 2018 मध्ये सर्वात प्रथम माहिती दिली होती. आता अखेर शहर बनविण्याचा अंतिम निर्णय निश्चित झाला आहे. आपल्या शहराबद्दल माहिती देताना त्याने सांगितले की, एकॉन सिटीबद्दल अंतिम करार पुर्ण झाला. भविष्यात तुम्हाला तेथे होस्ट करायला उत्सुक आहे. या देशात त्याची स्वतःची डिजिटल कॅश करेंसी असेल. याला Akion म्हटले जाईल.

हे शहर आफ्रिकेच्या सेनेगल येथे तयार केले जाणार आहे. एकॉन सिटीची निर्मिती सेनेगलचे राष्ट्रपती मॅके सैलद्वारे एकॉनला भेट देण्यात आलेल्या 2000 एकर जमिनीवर केली जात आहे. या शहराची निर्मिती प्रक्रिया मार्चपासून सुरू होईल व शहर पुर्ण होण्यासाठी एक दशकाचा कालावधी लागेल.

एकॉन टेनमेंट हे सौर उर्जेवर आधारित शहर असेल. येथे विमानतळ देखील असेल. एकॉनचा जन्म सेनेगलमध्येच झाला आहे.

Leave a Comment