प‌ॅरोलवर सुटलेला अजमेर बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी फरार


मुंबई – राजस्थानमधील अजमेर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटप्रकरणातील दोषी दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी फरार झाला असून मुंबईतील मोमीनपाडा येथे राहणारा आणि अजमेर येथील कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला जलील अन्सारी हा काही दिवसांपूर्वी प‌ॅरोलवर सुटून घरी आला होता.

दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये 21 दिवसांचा पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला हजेरी देण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. पण 16 जानेवारी रोजी घरातून पहाटे पाच वाजता नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे.

जलील अन्सारी याचा शोध घेण्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेत एकेकाळी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये हुशारकी मिळवली. त्यानंतर त्याने अजमेर येथे झालेल्या ब्लास्टसाठी बॉम्ब तयार केला होता. त्याचा अजमेर ब्लास्टमधील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Leave a Comment