गुप्त उपग्रहाच्या फोटोतून दिसली एव्हरेस्टची दैना


फोटो सौजन्य न्यूज १८
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे आता स्पष्ट दिसू लागले आहे. अमेरिकेच्या गुप्त सॅटेलाईट कोरोनाने १९६०च्या दशकापासून घेतलेल्या काही प्रतीमातून माउंट एव्हरेस्टच्या आसपास असलेल्या हिमनद्या किती वेगाने वितळत चालल्या आहेत याचे भयावह चित्र समोर आले आहे. आगामी १०० वर्षात ही परिस्थिती आणखी भीषण होणार असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिकन जिओफिजिकल युनियनने या संदर्भात एक रिपोर्ट १३ डिसेंबरला सादर केला आहे. १९५० च्या दशकात अमेरिकन वैज्ञानिकांनी पूर्ण सोव्हिएत युनियनवर नजर ठेवण्यासाठी करोना नावाचा हा गुप्त सॅटेलाईट लाँच केला होता. १९७२ पर्यंत या उपग्रहाने त्याचे काम केले. नंतर मिशनने १९९५ मध्ये ८ लाख फोटो सादर केले त्यात हिमालयाचे फोटो आहेत. त्यातून ही हैराण करणारी माहिती पुढे आली आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार रोन्ग्बुक आणि खुम्बक ग्लेशियर एव्हरेस्ट बेस कॅम्पपाशी आहेत त्या ६० वर्षात २६० फुट विरघळल्या आहेत. इमाजा हिमनदी ३०० फुट विरघळली आहे. पृथ्वी तापमान वाढीमुळे हिमनद्याचे वरचे आवरण वितळून आतील खडक उघडे पडू लागले आहेत. वास्तविक १९६० पासूनच या हिमनद्या वितळू लागल्याचे संकेत मिळत होते, पण आता हा वेग आणखी वाढला आहे.

Leave a Comment