कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला?

मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन राहिलेला पठाण गँगचा प्रमुख करीम लाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेने नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लालाला भेटायला मुंबईला येत असे. या वक्तव्यानंतर मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण गरम झाले.

असे म्हटले जाते की, करीम लालाने एकदा डी कंपनीचा प्रमुख दाऊद इब्राहिमला एकदा चांगलेच झोडपले होते. तो डॉन हाजी मस्तानच्या आधी मुंबईतील गुन्हेगारांचा प्रमुख होता.

करीम लालाचे खरे नाव अब्दुल करीम शेर खान होते. त्याचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला होता. तो पश्तून होता व वयाच्या 21व्या वर्षीच कामाच्या शोधात भारतात आला होता. 1930 मध्ये पेशावर वरून मुंबईला येऊन त्याने छोटेमोठे काम धंदे सुरू केले, मात्र ते त्याला काही जमले नाही.

त्याने सर्वात प्रथम मुंबईच्या ग्रँट रोड स्टेशनजवळ एक घर भाड्याने घेऊन तेथे सोशल क्लब नावाने जुगाराचा अड्डा सुरू केला. या कल्बने पाहता पाहता अख्या मुंबईवर धाक बसवला. या क्लबमध्ये अनेक प्रसिद्ध शेठ येत असे. यामुळे त्याच्या अनेक ओळखी झाल्या. जुगारासोबत त्याने मुंबईच्या बंदरावर महागडे दागिने, सोने, हिरे यांची तस्करी सुरू केली.

त्या काळात मुंबईत हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदराजन स्वतःचे वर्चस्व स्थापन करत होते. रक्तपात आणि धंद्यात होणारे नुकसान पाहून तिघांनी काम आणि क्षेत्राची विभागणी करून घेतली.

काही दिवसानंतर मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल इब्राहिम कासकरची दोन मुले दाऊद आणि शब्बीर हाजी मस्तानच्या गँगमध्ये सामील झाले. दोघांनी करीम लालाच्या क्षेत्रात तस्करी सुरू केली. यामुळे नाराज झालेल्या करीम लालाने दाऊदला मारहाण केली होती. मात्र त्यावेळी तो जीव वाचवून पळून गेला. मात्र पुन्हा एकदा दाऊदने करीम लालाच्या क्षेत्रात धंदा सुरू केला. त्यानंतर दाऊदला धडा शिकवण्यासाठी 1981 मध्ये पठाण गँगने दाऊदचा भाऊ शब्बीरच्या हत्या केली. 1986 मध्ये याचा बदला म्हणून दाऊदने करीम लालाचा भाऊ रहीम खानची हत्या केली.

19 फेब्रुवारी 2002 ला वयाच्या 90व्या वर्षी त्याचे मुंबईत निधन झाले.

Leave a Comment