या व्यक्तीने कपाटात लपवले एवढे पैसे की बँकच झाली रिकामी

चीनमधील एका व्यक्तीच्या घरातील कपाटात तब्बल 200 मिलियन युआन (जवळपास 205 कोटी रुपये) रोख रक्कम सापडल्याची घटना समोर आली आहे. एका कपाटात ठेवलेली एवढी मोठी रोख रक्कम पाहून चीनचे अधिकारी देखील हैराण झाले. हा कारनामा कोणत्याही छोट्या-मोठ्या व्यक्तीने केला नसून, ज्या व्यक्तीच्या घरात हे पैसे सापडले तो चीनमधील एका बँकेचा माजी प्रमूख होता.

या व्यक्तीचे नाव लाई जियाओमिन असून, तो चायना हुआरोंग मॅनेजमेंट कंपनीचा माजी प्रमुख आहे.त्यांच्या घरातील चार कपाटात हे पैसे ठेवण्यात आलेले होते. यामुळे बँकेला खूप मोठे नुकसान झाले. कारण हे पैसे बँकेच्या ग्राहकांनी लाच म्हणून लाई जियाओमिनला दिले होते.

Image Credited – FccEd

57 वर्षीय लाई जियाओमिनने या कोट्यावधी रुपयांचा खुलासा स्वतः एका टिव्ही कार्यक्रमात केला. त्याने सांगितले की, मी पैसे आणायचो व कपाटात ठेवायचो. त्यानंतर मी हे पैसे तेव्हाच पाहायचो, जेव्हा दुसऱ्या पैसे ठेवताना कपाट उघडत असे.

त्याने सांगितले की, मी त्या पैशातील एक रुपया खर्च केलेला नाही. अखेर सरकारी अधिकाऱ्यांनी ते पैसे जप्त केले असून, लाईवर लाच घेणे, भ्रष्टचार आणि दोन-दोन लग्न करण्याच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली आहे.

लाई जियाओमिनला 2018 मध्ये देखील 1.6 बिलियन युआन लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. लाईकडे महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने, घड्याळ आणि कलाकृती अशी मोठी संपत्ती आहे. लाई चीनमधील सर्वात भ्रष्ट अधिकारी देखील म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment