२०२१च्या ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सलमानचा ‘किक २’


बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान पुढच्या वर्षीच्या ईदसोबतच ख्रिसमसलाही त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’चा हा सिक्वल असणार आहे. ‘किक २’च्या प्रदर्शनाची तारीख दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने जाहीर केली आहे. हा चित्रपट २०२१च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे.


सलमानसोबतच इतर कोणाच्या भूमिका ‘किक २’ असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण तो या सिक्वलमध्ये डबल रोलमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानसोबतच ‘किक’मध्ये जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सलमान- जॅकलिनच्या केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्यामुळे सिक्वलमध्ये आता जॅकलिनच नायिका म्हणून झळकणार की दुसरी कोणती अभिनेत्री सलमानसोबत दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment