मायानगरीतील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्क्यांनी वाढ


मुंबई – दररोज वेगवेगळया प्रकारचे गुन्हे मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईसारख्या मोठया महानगरामध्ये घडत असतात. मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरात मागच्या वर्षभरात कोणत्या स्वरुपाचे किती गुन्हे घडले त्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत दररोज चोरीचे गुन्हे घडतात. पण २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये त्यामध्ये सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबई पोलिसांकडे २०१९ मध्ये एकूण ४१,९३२ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१८ च्या तुलनेत ०.१ टक्क्यांनी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले. ४१,९०१ गुन्हे २०१८ साली नोंदवण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. बलात्काराच्या १०१५ गुन्ह्यांची नोंद २०१९ मध्ये झाली. बलात्काराचे ८८९ गुन्हे २०१८ मध्ये नोंदवण्यात आले होते.

गुन्ह्याचा तपास करण्याचे पोलिसांचे प्रमाणही मोठे आहे. पोलिसांनी २०१९ मध्ये ४१,९३२ गुन्ह्यांपैकी २८,८०२ गुन्हयांचा तपास केला आहे. पोलिसांनी २०१८ मध्ये ४१,९०१ पैकी २८,८१२ गुन्ह्यांचा तपास केला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. बलात्काराप्रमाणे विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे.

विनयभंगाची २५८६ प्रकरणे २०१८ मध्ये नोंदवण्यात आली होती. २०१९ मध्ये विनयभंगाच्या २६७८ गुन्ह्यांची नोंद झाली. खंडणीचे गुन्हे २२८ वरुन २५३, दरोडेखोरीचे गुन्हे ९३१ वरुन ९८७, हत्येचा प्रयत्न २८० वरुन ३४३ पर्यंत वाढ झाली. हत्येच्या गुन्ह्याचे प्रमाण सारखेच आहे. कार चोरीच्या २६९३ घटना घडल्या. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा टक्क्यांनी घट झाली तर, पण बलात्काराचे गुन्हे १४ टक्क्यांनी वाढले.

Leave a Comment