‘फिट’ झालेला पृथ्वी शॉ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार


मुंबई – दुखापतीतून भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सावरला असल्यामुळे लवकरच तो न्यूझीलंड दौऱ्यावरील भारत ‘अ’ संघात सामील होईल. पृथ्वी शॉच्या खांद्याला मुंबई-कर्नाटक रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला नव्हता.

गुरुवार किंवा शुक्रवारी पृथ्वी न्यूझीलंडला रवाना होईल. तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पृथ्वीने सराव केला. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने आता स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी त्याला ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर शॉनेही सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

या दौऱ्यात भारतीय ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध ३ एकदिवसीय आणि २ चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. २२ जानेवारीपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्यानंतर ३० जानेवारीपासून चार दिवसीय कसोटी सामन्यांची मालिका सुरु होईल.

Loading RSS Feed

Leave a Comment