निलेश राणेंनी संजय राऊत यांची पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली तुलना


मुंबई – बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये मी दाऊद इब्राहिमला दम दिल्याचे म्हटले होते. त्यावरुनच भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आता राऊतांवर टीका करत त्यांची तुलना थेट पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली आहे.

संजय राऊतांनी पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. यावेळेस पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत, दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे मी फोटो काढले आहेत. मी दाऊद इब्राहिमला दम देखील दिला असल्याचे म्हणाले. त्याचबरोबर माझी बाळासाहेब ठाकरे फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे, अशी आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.


यावर टीका करताना निलेश यांनी एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे, हे संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे चांगला विनोद असल्याचा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर असे म्हटले आहे.


अशाप्रकारे शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करुन टीका करण्याची निलेश राणे यांची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधीही अनेकदा ट्विटवरुन संजय राऊत यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Comment