काजोलसोबत पहिल्यांदाच करणार काम मुक्ता बर्वे


दर आठवड्याला नवनव्या चित्रपटांची बॉलिवूडमध्ये भर पडत असते. अशातच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक मल्टिस्टारर लघुपट येत आहे. या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदीसोबतच मराठी कलाकारसुद्धा यामध्ये झळकणार आहेत. मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे या लघुपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काजोलसोबत काम करणार आहे. या लघुपटामध्ये काजोल आणि मुक्तासोबतच श्रुती हासन, नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, संध्या मात्रे, रमा जोशी, शिवाजी रघुवंशी आणि यशस्विनी दायमा त काम करणार आहेत. या लघुपटाचे नाव ‘देवी’ असे असून नुकतेच त्याचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


या लघुपटाच्या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे बुरख्यात पाहायला मिळत आहे तर एका आईच्या भूमिकेत काजोल असल्याचे वृत्त आहे आणि महत्वाचे म्हणजे या लघुपटाचे चित्रीकरण केवळ दोन दिवसांत पूर्ण झाले आहे. या लघुपटाच्या लेखनासह त्याचे दिग्दर्शन देखील प्रियंका बॅनर्जीने केले आहे. अभिनेत्री काजोलचा हा पहिलाच लघुपट असून श्रुतीसुद्धा ‘देवी’च्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. महिलांशी संबंधित याचा विषय असल्याचे लघुपटाच्या पोस्टरवरूनच स्पष्ट होत आहे. प्रेक्षकांमध्ये दमदार कलाकारांची फौज असलेल्या या लघुपटाची फार उत्सुकता आहे.

Leave a Comment