राजघराणे सोडल्यानंतर ‘मेग्झिट’ नावाच्या वस्तूंची तूफान विक्री

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्याचे पद त्यागून आर्थिकरित्या आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र आता ऑनलाईन वेबसाईट्स वर ‘मेग्झिट’ नावाने अनेक वस्तूंची विक्री करण्यात येत आहे.

ब्रिटनने यूरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘ब्रेक्झिट’ ही संज्ञा लोकप्रिय झाली होती. त्याचनुसार, आता प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्याचे पद त्यागल्यानंतर ‘मेग्झिट’ संज्ञा लोकप्रिय ठरली आहे.

मेग्झिट नावाने अनेक मर्चेंडाइजची ऑनलाईन विक्री होत आहे. अॅमेझॉनवर अशा 250 वस्तू आहेत. ईबेवर देखील या थीमवर आधारीत 50 प्रोडक्ट उपलब्ध आहेत. इट्सी, जॅजल आणि रेब बबल यांनी देखील या थीमवर कपडे आणि दुसऱ्या वस्तू विकण्यास सुरूवात केली आहे. मेग्झिटचे स्लोगन असलेल्या कपड्यांची देखील जोरदार विक्री होत आहे.

याच प्रमाणे एका मगाची देखील विक्री होत असून, त्यावर मेग्झिटचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. मेग्झिट म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या खराब संबंधांमधून बाहेर पडत तुमच्या चांगल्या आयुष्याला सुरूवात करता.

प्रिन्स हॅरी आता कॅनडाला जात असल्याने एका कुशनवर यूनियन जॅक आणि कॅनडाच्या ध्वजावर ‘हॅप्पी मेग्झिट’ लिहिण्यात आले आहे.

6 महिन्यांपुर्वीच प्रिन्स हॅरी आणि मार्केलने ससेक्स रॉयल ब्रँडचे जवळपास 100 आयटम ट्रेडमार्क केले होते. यामध्ये पेन्सिल, मोजे, टी-शर्टचा समावेश होता. या उत्पादनांची विक्री जवळपास 3680 कोटींची असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment