राज्याच्या राज्यपालांनी आवळला मराठी राग


मुंबई – महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांचा राज्यात राहणा-या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह असतो, किंबहुना तसा आग्रह महाराष्ट्रात राहणा-या कित्येक मराठी माणसांचाही असतो. पण असेच काहीसे वक्तव्य आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील केले आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नवी मुंबईत केले. कोश्यारी यांच्या हस्ते वाशी येथे उभारण्यात आलेल्या ‘उत्तराखंड भवन’चे लोकार्पण राज्यपाल झाले, त्यावेळी ते बोलत होते

सांस्कृतिक आदानप्रदान व एकतेची महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये भावना आहे. बरेचसे साधर्म्य मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक असल्याचे भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

उत्तराखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगून कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पण येथे वास्तव्य करताना आपल्या मूळ राज्याला, प्रांताला विसरू नका, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मूळ गावांना अवश्य भेटी द्या, असे आवाहन कोश्यारी यांनी केले.

Leave a Comment