कार्तिक-साराच्या ‘लव आज कल’चे नवेकोरे पोस्टर तुमच्या भेटीला


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी ‘लव आज कल’ या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. बऱ्याच काळापासून या दोघांचे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. पण आता पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी ‘लव आज कल’च्या या पोस्टरमध्ये जबरदस्त दिसत आहे. चाहते या पोस्टर चांगला प्रतिसाद देत आहे. पहिल्यांदा या नव्या जोडीला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.


कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये झोपलेला दिसत आहे तर सारा नाराज असल्याचे दिसत आहे. सारा आणि कार्तिकने ‘लव आज कल’ या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर चाहते खूप प्रतिसाद देत आहेत. १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी सारा आणि कार्तिक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केले आहे.

Leave a Comment