इंस्टाग्रामने चॅटिंगसाठी आणले भन्नाट फीचर

फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामने काही दिवसांपुर्वीच टीकटॉक अ‍ॅपप्रमाणे शॉर्ट व्हिडीओसाठी बुमरँग स्टोरीज फीचर आणले आहे. आता कंपनी आणखी मेसेजिंग फीचरचे टेस्टिंग करत असल्याचे समोर येत आहे. कंपनी डेस्कटॉप व्हर्जनसाठी नवीन फीचरचे टेस्टिंग करत असून यात युजर्सला मोबाईल प्रमाणेच डेस्कटॉपवरून देखील डायरेक्ट मेसेज करण्याची सुविधा मिळेल.

इंस्टाग्रामने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने स्पष्ट केले की, डायरेक्ट मेसेजिंग फीचरचे टेस्टिंग सुरू असून, यानंतर तुम्ही कोठूनही मेसेज वाचू शकता व रिप्लाय करू शकता.

मोबाईल युजर्ससाठी डायरेक्ट मेसेजिंग फीचर आधीपासूनच उपलब्ध असून, आता वेब व्हर्जनसाठी देखील लवकरच युजर्सच्या भेटीला येणार आहे.

हे फीचर कधी रोलआउट होईल याबाबत मात्र इंस्टाग्रामने अद्याप माहिती दिलेली नाही. या फीचरमुळे डेस्कटॉपवर इंस्टाग्राम ओपन करून मित्रांशी संवाद साधणे सोपे होईल.

Leave a Comment