या डेबिट कार्डवर जवानांना मिळणार 1 कोटीपर्यंतचा विमा

गृह मंत्रालयाने ‘पॅरा मिलिट्री सर्व्हिस पॅकेज’ डेबिट कार्डला अपग्रेड केले आहे. यामुळे केंद्रीय अर्धसैनिक दलातील 10 लाखांपेक्षा अधिक जवान आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल. त्यांना एका कार्डावर अनेक सुविधा मिळतील. अनेक प्रकारच्या कर्जासोबतच त्यांना विमा सुरक्षा देखील मिळेल.

सुभेदार मेजरपर्यंत 75 हजार रुपये, सहाय्यक कमांडेट ते डिप्टी कमांडेटपर्यंत दीड लाख रुपये व त्यावरील सर्व रँकच्या अधिकाऱ्यांनी 2 लाख रुपयांपर्यंतच्या ओव्हर ड्राफ्टची सुविधा मिळेल. एअर एक्सिडेंटल विमा 1 कोटींचा आहे.

गृह मंत्रालयासोबत झालेल्या करारानुसार या सर्व सुविधा एसबीआय प्रदान करेल. या योजनेचा कालावाधी 4 जानेवारी 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत आहे.

सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एनएसजी, एसएसबी, आयटीबीपी आणि आरपीएसएफच्या जवान आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या रँकनुसार डेबिट कार्ड दिले जात आहे. सुभेदार मेजरपर्यंत गोल्ड कार्ड, सहाय्यक कमांडेट ते डिप्टी कमांडेटपर्यंत डायमंड कार्ड व टूआयसी ते डिजीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना प्लेटिनम कार्ड मिळेल. या कार्डाचे लाभ पेंशनधारकांना देखील मिळतील. मात्र पेंशनधारकांसाठी पर्सनल एक्सिडेंट विम्याची सुविधा नसेल.

डेबिट कार्डची वैशिष्ट्ये –

  • लाइफ टाइम यूनिक अकाउंट नंबरची सुविधा
  • पर्सनल एक्सिडेंट मृत्यू विमा कव्हर 30 लाख रुपये
  • एअर एक्सिडेंट मृत्यू विमा कव्हर 1 कोटी रुपये
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 30 लाख रुपये
  • आंशिक अपगंत्व आल्यास 10 लाख रुपये
  • भाजल्यास प्लास्टिक सर्जरीसाठी 2 लाख रुपये
  • इंपोर्टेड औषधांसाठी वाहतूक खर्च 1 लाख रुपये
  • अपघातानंतर कोमा अथवा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये
  • मुलीच्या विवाहासाठी कव्हर 2 लाख रुपये
  • मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 4 लाख रुपये
  • दुर्घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी परिवारातील 2 सदस्यांना 20 हजारापर्यंत वाहतूक खर्च
  • रुग्णवाहिका चार्जेस 1,500 रुपये

आंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्डवर पर्सनल एक्सिडेंट विमा मृत्यू कव्हर व्यतरिक्त 2 लाख  आणि 5 लाख रुपये विमा कव्हर मिळेल. सोबतच 4 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचा एअर एक्सिडेंट कव्हर वेगळा असेल. चेक इन बँगेज लॉससाठी विमा कव्हर 25 हजार आणि 80 रुपये ठरवण्यात आला आहे.

कार्ड हरवल्यास 80 हजार आणि 2 लाख रुपयांचा विमा प्रदान केला जाईल. आंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्डद्वारे एकावेळी 50 हजार रुपये काढता येतील. तर प्लेटिम कार्डची सीमा 1 लाखांची आहे.

Leave a Comment