लोकप्रियतेच्या यादीत दिशा पटनी ठरली नंबर 1 ट्रेंडिंग अॅक्ट्रेस


बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींची 2020च्या सुरूवातीला ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियानूसार, दिशा पटनी, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका पादुकोणचेच गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर अधिराज्य असलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर ट्विटरवर दिशा पटनी सर्वाधिक प्रसिध्द असलेली अभिनेत्री असून तिने लोकप्रियतेमध्ये बॉलिवूडमधील सीनियर असलेल्या प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

दिशाने लोकप्रियतेत पहिल्यांदाच प्रियंका आणि दीपिकाला टक्कर देत 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवरच्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये अव्वल स्थान स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी दिली आहे.

ट्विटरवर 2020च्या सुरूवातीलाच सर्वाधिक लोकप्रिय बनलेल्या या अभिनेत्रीच्या आकर्षक कमानीय यष्टीमूळेही दिशा युवा वर्गात सध्या चांगलीच प्रसिध्द आहे. दुस-या स्थानी असलेली ग्लोबल आइकॉन प्रियंका चोप्रा जोनस तर सध्या जगप्रसिध्द असल्याने जगभरातून तिला ट्विटरवर फॅनफॉलोविंग लाभलेली असल्यामूळेच प्रियंका चोप्रा 98 गुणांसह ट्विटरवर लोकप्रिय असलेली दुसरी अभिनेत्री बनली आहे. दीपिका गेले काही दिवस ट्विटरवर सामाजिक संदेश असलेल्या ‘छपाक’ चित्रपटामुळे चर्चेत दिसून येत होती. लोकप्रियतेत 84 गुणांसह दीपिकाने तिसरे स्थान पटकावले आहे.

याबाबत माहिती देताना स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी म्हणतात, अभिनेत्री दिशा पटनीची युवावर्गात सध्या चांगलीच लोकप्रियता आहे. तरूणवर्गाची ट्विटरवरील तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया आणि पेजवरची एंगेजमेंट पाहून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. प्रियंका चोप्राच्या ट्विटर पेजवर ग्लोबली एंगेजमेंट दिसून आली आहे. प्रियंका-नीकच्या फोटोला त्यांच्या चाहत्यांची जास्त एंगेजमेंट दिसून आली आहे. ‘छपाक’ चित्रपटाचे प्रमोशन, जेएनयुच्या मीटिंगला दीपिकाची उपस्थिती आणि ‘छपाक’मध्ये दिसलेला दीपिकाचा चांगला परफॉर्मन्स या सर्वाचा एकत्रित परिणाम तिच्या ट्विटर पेजवरची एंगेजमेंट वाढण्यात झाला आहे.

Leave a Comment