बीसीसीआयच्या ‘ग्रेड ए प्लस’मधून धोनीला डच्चू


मुंबई: २०१९-२० या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले असून क्रिकेटपटूंना ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. यात ग्रेड ‘ए प्लस’ मध्ये म्हणजे सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तिघांचा समावेश करण्यात आला आहे.


‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे चार प्रकार क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड करण्यात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.

ग्रेड पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा ‘ग्रेड ए प्लस’मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा ‘ए ग्रेड’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे ‘ग्रेड बी’ मध्ये खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमा विहारी, शादुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. दरम्यान बीसीसीआयने या करारातून गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या महेंद्रसिंह धोनीला वगळले आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीने भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.

Leave a Comment