एनपीआरमध्ये आधार कार्ड, पासपोर्टची माहिती देणे बंधनकारक

1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये (एनपीआर) आधार कार्ड, पासपोर्ट नंबर, मतदान ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती देणे अनिवार्य असेल. जर व्यक्तीकडे या पैकी एकही कागदपत्र असेल तर त्याला माहिती देणे बंधनकारक आहे. पॅन कार्डच्या कॉलमला विरोधामुळे हटवण्यात आले आहे.

जर एखाद्या व्यक्तीकडे यापैकी कोणतेही कागदपत्रे नसेल, तर त्याला याची माहिती द्यावी लागणार नाही. जर हे कागदपत्रे असेल तर माहिती देणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी पुरावा म्हणून कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे म्हणाले होते की, एनपीआरमध्ये आधार कार्डची माहिती देणे ऐच्छिक असेल. मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी ऐच्छिकचा अर्थ सांगताना स्पष्ट केले होते की ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत अशांसाठी केवळ ऐच्छिक हा पर्याय आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत ते फॉर्ममधील कॉलम रिकामे ठेऊ शकतात.

एनपीआर दरम्यान योग्य माहिती न दिल्यास कुटुंबातील प्रमुखाला 1000 रुपये दंड देखील होऊ शकतो.

Leave a Comment