केरळच्या बेकरीत बनवला गेला विक्रमी केक

केरळमध्ये 1500 शेफ्सनी मिळून जगातील सर्वात लांब केक बनवण्याचा विक्रम केला आहे. तब्बल 6.5 किमी लांब केक बनविण्यासाठी अनेक बेकर आणि शेफनी मदत केली. या वेनिला केकचे वजन जवळपास 27 हजार किलो होते. हा केक 4 इंच जाड व रुंद होता.

हजारो टेबल आणि डेस्क एकमेंकाना जोडून त्यावर केक बनवण्यात आला. यावेळी सर्व बेकर आणि शेफ्सनी पांढरे टी-शर्ट आणि एप्रिन परिधान केले होते. हा केक बनविण्यासाठी 4 तास लागले. यासाठी 12 हजार किलो साखर आणि पिठाचा वापर करण्यात आला.

Image Credited – Bhaskar

हा केक बेकर्स असोसिएशन केरळने (बेक) बनवला. बेकचे सचिव नौशाद यांनी सांगितले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केकची लांबी मोजली असून, हा केक जवळपास 6500 मीटर लांब होता. मात्र त्यांनी अद्याप याचे प्रमाणपत्र दिलेले नाही. आम्हाला विश्वास आहे की, हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नक्की बनेल.

Image Credited – Bhaskar

नौशाद यांनी सांगितले की, हा केक चीनचा विक्रम तोडेल. 2018 मध्ये चीनने 3.2 किमी लांब फ्रुटकेक बनवला होता. ज्याला चायनीज बेकर्स इन जिझीने बनवले होते.

Leave a Comment