पतंगवेड्या या माणसाच्या हातात पतंग, गळ्यात, बोटातही पतंग


फोटो सौजन्य न्यूज १८
सध्या मकरसंक्रांतिनिमित् देशभर विविध ठिकाणी पतंगबाजी जोरात सुरु आहे. अनेकांना पतंग उडविणे आणि पतंग काटाकटी स्पर्धात सहभागी होण्याची मजा लुटायला आवडते. पण भोपाळवासी ७० वर्षीय लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांचे पतंगवेड हे मात्र वेगळेच प्रकरण आहे. गेली ५० वर्षे ते पतंग उडवीत आहेत. वर्षातून एकदा संक्रांत संपली की पतंगबाजी संपते. पण खंडेलवाल याना पतंगापासून दूर राहणे आवडत नाही यामुळे त्यांनी गळ्यात पतंगाची लॉकेट, बोटात पतंग आकाराच्या अंगठ्या घातल्या आहेत. त्यांच्या गळ्यात पतंगाबरोबर चकारीही लॉकेट स्वरुपात असून त्यांच्या या सर्व पतंग दागिन्यांची किंमत ५ लाखाहून अधिक आहे.


खंडेलवाल केवळ पतंग उडवीत नाहीत तर पतंग स्पर्धा सुरु झाल्या की कॉमेंट्रीही करतात आणि ती अतिशय बहारदार असते असे त्यांना ऐकणारे प्रेक्षक सांगतात. मंगळवारी खंडेलवाळ यांनी अशीच भन्नाट कॉमेंट्री करून उपस्थित लोकांचे लक्ष वेधून घेतले. खंडेलवाल सांगतात ते १० वर्षाचे असल्यापासून पतंग उडविण्याचे शौकीन आहेत. पतंगांचे त्यांचे हे वेड आजही कायम आहे. दरवर्षी ते पतंगाच्या आकाराचा एखादा तरी छोटा मोठा दागिना सोन्यात घडवितात. हे सर्व दागिने अंगावर घालून ते पतंग स्पर्धेत सामील होतात. त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि त्यांचे कौतुकही करतात.

या पतंगवेडामुळे खंडेलवाल यांची या परिसरात पतंग हीच ओळख बनली आहे.

Leave a Comment