५ रुपयाची ही नोट बनवेल मालामाल


फोटो सौजन्य नई दुनिया
जुन्या नोटा, जुनी नाणी यांचा संग्रह करण्याचा छंद अनेकांना असतो. हे संग्राहक त्यांना हव्या असलेल्या जुन्हा प्राचीन आणि दुर्मिळ नोटा नाणी मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजतात. आपल्याकडेही अश्या नोटा अथवा नाणी असू शकतात पण ती गरजूंपर्यंत पोहोचवायची कशी याची माहिती नसते. त्यासाठी इकॉमर्स साईट वर अश्या नोटा लिलावात विकल्या जातात. इबे अथवा इंडियन ओल्ड कॉइन अश्या वेबसाईटवर अश्या नोटा नाणी विकली जाऊ शकतात.

सध्या ५ रुपयाची नोट अशी बरीच डिमांड मध्ये आहे. तेव्हा तुमच्याकडे ७८६ नंबर सिरीज मधली पाच रुपयंची अथवा ट्रॅक्टरवाली प्रतिमा असलेली ५ रुपयांची नोट असेल तर ती तुम्हाला मालामाल बनवू शकते. या नोटा ऑनलाईन विक्री करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेली नोट अथवा प्राचीन नाण्याचा फोटो वरील प्रकारच्या वेबसाईटवर लोड केला की त्याची लिलाव प्रक्रिया सुरु होते. हे करताना वेबसाईट विश्वसनीय असेल याची खात्री जरूर करून घ्यावी.


जुनी नाणी नोटा विक्री संदर्भात २०१८ मध्ये सादर झालेल्या रिपोर्टनुसार काही इकॉमर्स वेबसाईटवर अश्या नोटा नाणी कोट्यवधी रुपयात विकली गेली आहेत. १७४० सालचे एक नाणे ३ कोटी रुपयांना, १०१८ मधले मक्का मदिना चित्र आणि ७८६ नंबर असलेले नाणे अडीच कोटी रुपयांना विकले गेले आहे. ४०० वर्षे जुन्या चांदीच्या शिवप्रतिमा असलेल्या नाण्याला साडेतीन लाख रुपये, १७०० सालातले जगन्नाथ प्रतिमेचे नाणे साडेचार लाख रुपयांना विकले गेले आहे. माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डचा एक शिक्का ५० लाख रुपयांना विकला गेला आहे. त्यावर माता दुर्गेची प्रतिमा होती.

Leave a Comment