या युवतीने मोडले स्वतःचेच गिनीज रेकॉर्ड


फोटो सौजन्य झी न्यूज
गुजरातची टिनएजर निलांशी पटेल हिने केसाच्या लांबीचे स्वतःचेच गिनीज रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड स्थापण्याचा विक्रम केला आहे. अवघी १७ वर्षीय निलांशी जगात सर्वाधिक लांबसडक केस असलेली टिनएजर म्हणून गिनीज बुक मध्ये सामील झाली असून तिच्या केसांची लांबी १९० सेंटीमीटर म्हणजे ६ फुट २ इंच आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड तिच्याच नावावर होते तेव्हा तिच्या केसांची लांबी १७०.५ सेंटीमीटर होती. निलांशी या रेकॉर्ड मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अरवली येथे राहणारी निलांशी सहा वर्षाची होती तेव्हा तिने शेवटचे केस कापले होते. त्यानंतर तिने केस वाढवायचा निर्णय घेतला आणि घराच्या लोकांनी तिला पाठिंबा दिला. निलांशी सांगते लांबसडक केस हा माझ्यासाठी लकी चार्म ठरला आहे. जेथे जाते तेथे माझ्या केसांची चर्चा होते, लोक सेल्फी काढण्यासाठी विनंती करतात आणि त्यामुळे मला सेलेब्रिटीसारखा फील येतो. निलांशीची आई सांगते, तिच्या केसांची खूप काळजी घ्यावी लागते. केसांसाठी आम्ही कोणतेही कॉस्मेटिक वापरत नाही. आठवड्यातून एकदा केस धुतले जातात आणि फक्त तेल लावले जाते.

Leave a Comment