यंदाच्या प्रजासत्ताकदिनी ब्राझील राष्ट्रपती बोल्सोनारो प्रमुख पाहुणे


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
२६ जानेवारीला देशात साजऱ्या होत असलेल्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून यंदा ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो उपस्थित राहणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर केले गेले आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी जेर याना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते आणि जेर यांनी ते आनंदाने स्वीकारले आहे असे समजते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या राजपथावर अतिशय सुंदर असे संचलन होते त्यात सैन्य परेडसह विविध राज्यांची संस्कृती, परंपरा दाखविणाऱ्या रथांचा समावेश असतो. गतवर्षी द. आफ्रिकेचे राष्ट्रपती सायरील रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारया ब्राझील राष्ट्रापतीमध्ये जेर तिसरे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी १९९६ व २००४ मध्येही ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जेर बोल्सोनारो यांनी त्यांच्यासोबत मोठे बिझिनेस डेलिगेशन भारत भेटीवर येणार असल्याचे सांगितले असून या भेटीत भारत आणि ब्राझील या दोन देशातील व्यापार, गुंतवणूक, डिफेन्स सहकार्य अश्या अनेक बाबींवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment