आता ट्विटरच्या माध्यमातून करता येणार पैशांची देवाण-घेवाण

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर देखील आता गुगल आणि फेसबुकप्रमाणे लवकरच पेमेंट सिस्टम आणणार आहे. रिपोर्टनुसार, ट्विटर आपल्या पेमेंट सिस्टमची तयारी करत असून, यावर जोरात काम सुरू आहे. पेमेंट फीचरद्वारे युजर्सला एकमेंकाना पैसे पाठवणे सोपे होईल. ट्विटरच्या या पेमेंट सिस्टमचे नाव टिपिंग (Tipping) असण्याची शक्यता आहे.

ट्विटरची ही पेमेंट सेवा कंपनीचे सीईओ जॅक डॉर्सी यांची दुसरी कंपनी स्क्वेअरसोबत काम करेल. स्क्वेअर ही फायनेंशियल सर्विस देणारी कंपनी आहे. ही कंपनी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये मोबाईल पेमेंट सेवा देखील देते. ट्विटरची ही पेमेंट सेवा केवळ बिटक्वाइनसाठी देखील असण्याची शक्यता आहे. म्हणजेच युजर्स केवळ बिटक्वाइनमध्ये पेमेंट करू शकतील.

जॅक डॉर्सीनुसार, बिटक्वाइन भविष्यातील इंटरनेट करेंसी आहे. स्क्वेअर क्रिप्टोकरेंसी पेमेंटवर देखील काम करत आहे.

 

Leave a Comment