कार्सबद्दल असे म्हटले जाते की, जेवढी जुनी गाडी असेल तेवढे त्याचे बाजार मुल्य कमी होते. मात्र ही गोष्ट केवळ नवीन गाड्यांना लागू होते. जुन्या एंटीक कार्ससाठी हे लागू होत नाही. एंटीक कार जेवढ्या जुन्या होतात, तेवढी त्यांची किंमत अधिक वाढते. अशाच काही कोट्यावधी किंमत असलेल्या एंटीक कार्सविषयी जाणून घेऊया.

जॅग्वार ई-टाइप –
1957 मध्ये लाँच झालेल्या जॅग्वार व्ही-12 बद्दल सांगितले जाते की, अशा केवळ बाराच कार बनल्या होत्या. ज्यातील 12 आजही आहेत. स्पोर्टी आणि रनव्हर्टिबल फीचरमध्ये येणाऱ्या या कारचा टॉप स्पीड ताशी 241 किमी आहे. जगातील सर्वात सुंदर कार पैकी एक असणाऱ्या या कारची किंमत 213 कोटी रुपये आहे.

फियाट 500 –
या कारला 1957 मध्ये लाँच करण्यात आले होते. लवकरच ही 4 सीटर कार लोकप्रिय झाली होती. आजही 22 लाख रुपयांपर्यंत ही कार खरेदी केली जाते. याच्या रिस्टोरेशनसाठी जवळपास 7 लाख रुपये खर्च येतो. या मॉडेलचे मॉर्डन व्हर्जन 2010 मध्ये उत्तर अमेरिकेत लाँच करण्यात आले होते. मात्र कमी विक्रीमुळे 2020 मध्ये हे बंद करण्यात आले.

रॉल्स रॉयस 15 एचपी –
1904 मध्ये लाँच झालेली रॉल्स रॉयस अनेक गोष्टीत यूनिक आहे. त्यावेळी कंपनीने केवळ अशा 6 कार्स बनवल्या होत्या. ज्यातील आज केवळ 1 बाकी आहे. त्यामुळे याची किंमत 248 कोटींपेक्षा अधिक आहे.

एमके1 वॉल्सवेगन गोल्फ जीटीआय –
या कारला फ्रॅकफर्ट मोटार शोमध्ये 1975 ला सादर करण्यात आले होते. याला ओरिजनल हॅचबॅक कार देखील म्हटले जाते. रॅबिटच्या नावाने प्रसिद्ध ही कार प्रसिद्द होती. 1983 पर्यंत या सारख्या 43 हजार कार्स बनविण्यात आल्या होत्या. सुरूवातीला यात 1.6 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले होते. नंतर ते वाढवून 1.8 लीटर करण्यात आले. या कार खूप कमी आहेत, ज्यामुळे यांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे.

हेलिका डे लेयात –
1921 मध्ये आलेली हेलिका डे लेयात पाहताना एखाद्या विमानाप्रमाणे वाटते. अशा केवळ 30 कार तयार करण्यात आल्या होत्या. याचा टॉप स्पीड ताशी 130 किमी होता. या हटके कारची किंमत आजच्या तुलनेत 120 कोटींपेक्षा अधिक आहे.

फेरारी 250 जीटी –
1962 मध्ये लाँच झालेल्या फेरारी 250 जीटीला केवळ 2 वर्ष बनवण्यात आले. या काळात केवळ 39 कार तयार झाल्या होत्या. 2018 मध्ये एका लिलावात या कारची 270 कोटी रुपयांना विक्री झाली होती.

एस्टॉन मार्टीन डीबीआर1 –
1956 मध्ये लाँच झालेली एस्टॉन मार्टीन डीबीआर1चा सर्वात महागड्या कारमध्ये समावेश आहे. याचे केवळ 5 मॉडेल्स तयार केले होते. 2017 मध्ये या कारचा लिलाव झाला त्यावेळी यासाठी 160 कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यानंतर ही ब्रिटनची सर्वात महागडी कार झाली होती.